खासदार मोहन डेलकर मृत्यू प्रकरण, पोस्टमार्टम रिपोर्टमधून कारण तर कळले पण कारणीभूत कोण याचा शोध सुरु

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (mp mohan delkar death case)यांचा मुंबईच्या हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू (Dadra nagar haveli MP suicide case) झाला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आले आहे.

    मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (mp mohan delkar death case)यांचा मुंबईच्या हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू (Dadra nagar haveli MP suicide case) झाला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आले आहे. डेलकर यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे समोर आले आहे. फास लागल्याने श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचं झाला आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

    खासदार मोहन डेलकर  दादरा नगरहवेली मतदासंघातून लोकसभेवर ७ वेळा निवडून आले आहेत.त्यांनी अचानक मुंबईत येऊन आत्महत्या करण्यामागे काय कारण असावं याचा उलगडा अजुनही झालेला नाही. डेलकर ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते तिथे गुजरातीत लिहीलेली एक १५ पानांची चिठ्ठीसुद्धा सापडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार या चिठ्ठीत अनेक मोठ्या नावांचा उल्लेख आहे. खासदार डेलकर यांना कोणी ब्लॅकमेल करत होतं का, ते नैराश्यात होते का, या सगळ्याची माहिती पोलीस गोळा करत आहेत.सात वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या लोकसभा सदस्याचा असा विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.