पवईत कोरोनाबाधितांमध्ये होतेय वाढ, रुग्णांचा आकडा पोहोचला ५२ वर

मुंबई :पवईत कोरोना बाधितांमध्ये वाढ होत आहे . कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली होती. फुले नगर या एकाच वस्तीत तब्बल ६ बाधित आढळल्याने गंभीर वातावरण निर्माण झाले. तरीही नोंदी

 मुंबई : पवईत कोरोना बाधितांमध्ये वाढ होत आहे . कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली होती. फुले नगर या एकाच वस्तीत तब्बल ६ बाधित आढळल्याने गंभीर वातावरण निर्माण झाले. तरीही नोंदी सुरुच होत्या असल्याने पवईकरांनी काळजी घेणे आवश्यक झाले आहे.शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात १२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. बहुतांश नवीन रुग्ण हे पूर्वी आढळलेल्या रुग्णाच्या परिवारातील असल्याचे प्रामुख्याने समोर येत आहे. नुकतेच आयआयटी मुंबईतील रहिवाशी असलेली ४३ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. सायन रुग्णालयात वैद्यकीय परिचारिका म्हणून त्या कार्यरत आहेत. याबाबत आयआयटी संचालकांनी ट्वीट करत दुजोरा दिला. 

याच दिवशी पालिका ‘एल’ विभाग मात्र पवईतीलच एका वसाहतीत एक ४६ वर्षीय महिलासुद्धा कोरोनाबाधित मिळून आली आहे. यापाठोपाठ पवईतील मिलिंदनगर म्हाडा वसाहतीत राहणारा आणि रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा २६ वर्षीय तरुणाचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याच दिवशी हिरानंदानी रुग्णालय जवळील वस्तीत राहणारा २२ वर्षीय तरुण सुद्धा कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. मिलिंदनगर येथील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा शनिवारी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. २४ एप्रिल रोजी कोरोना बाधित मिळून आलेल्या रुग्णाच्या परिवारातील त्या सदस्य आहेत. याचवेळी मिलिंदनगर येथील म्हाडा वसाहतीत १ मे रोजी मिळून आलेल्या कोरोना बाधित तरुणाच्या घरातील २८ वर्षीय महिला, ७ वर्ष वयाची मुलगी, ५१ वर्षीय महिला आणि ३३ वर्षीय पुरुष असे ४ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील एकाला हिरानंदानी रुग्णालयात, एकाला सेव्हन हिल रुग्णालयात तर दोघांना पालिका अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पवईतील फुले नगरात एकाचवेळी ६ जण आढळलेल्या वस्तीत कोरोना अहवालाच्या विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. पालिकेच्या अधिकाऱ्याने आधी या रुग्णाला ‘चल तू पॉझिटिव्ह आहेस बॅग भर’ अस सांगत आवरायला सांगितले. भेदरलेला तो रुग्ण आवराआवर करत होता. मात्र काही वेळेतच ‘नाही तू…  निगेटीव्ह आहेस नको येऊस’ अस सांगण्यात आले. आधी नाराज झालेला चेहऱ्यावर हास्य उमटले. पण त्याला होम क्वारंटाईन सुचवण्यात आले आहे. 

विक्रोळी सूर्य नगरमध्ये राहत असलेला बाधित असल्याचे‌ समजल्यावर संधी साधत पळून गेला. दुपारी अचानक पालिकेचे कर्मचारी त्याच्या घरी आले. तो कोरोना बाधित असल्याचे सांगतले. शेजारच्या सात आठ जणांना क्वारंटाईनसाठी नेले. मात्र बाधिताला रुग्णवाहीका नसल्याने थोड्या वेळात परतरणार होते. दरम्यान दुपारी कोण‌ नाही असे पाहत हा रुग्ण पळून गेला असल्याचे समजत आहे.