पवई हिरानंदानी येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांच्या जेवणात आढळल्या अळ्या

मुंबई: कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केले तर जात आहे परंतु त्यांना वेळेवर कुठलीही उपयोगी वस्तू तर भेटत नाही आहे व त्याच बरोबर जेवणाच्या बाबतीत देखील तक्रारी समोर येत आहेत.

मुंबई: कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केले तर जात आहे परंतु त्यांना वेळेवर कुठलीही उपयोगी वस्तू तर भेटत नाही आहे व त्याच बरोबर जेवणाच्या बाबतीत देखील तक्रारी समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार हा पवई हिरानंदानी येथील एस प्रभागाच्या हद्दीत असलेल्या विलगीकरण कक्षामध्ये घडला. इथे दुपारी नागरिकांना दिलेल्या जेवणामध्ये अळ्या सापडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या सेंटरमध्ये आज दुपारच्या जेवणामध्ये वरण ,भात ,भाजी हा मेनू देण्यात आला होता. यावेळी सेंटरमध्ये असलेल्या काही महिलांना जेवताना त्यांच्या प्लेटमध्ये असलेल्या वरणामध्ये या अळ्या दिसून आल्या. यासंदर्भात त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. परंतु अद्यापही या घटनेची कुठलीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या सेंटरमध्ये मिळत असलेल्या जेवणाच्या दर्जाबाबत नागरिकांनी सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी आता केली जात आहे.