बोनस देण्याबाबत वीज कंपन्यांचा टाळाटाळ, वीज कामगारांचा धरणे आंदोलन करण्याचा निर्णय

राज्यातील सर्व महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमध्ये ८६ हजार कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. तसेच दिवाळीच्या आधी आठ दिवस अगोदर बोनस दिला जात होता. परंतु यांदा कामगार संघटनांनी मागणी करूनही बोनस देण्याबाबत अवाक्षरही काढलेला नाही.

कोरोना महामारीमुळे (Corona virus) राज्यातील वीज कामगारांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. मात्र व्यवस्थापनाने कामगारांना दिवाळी बोनस (diwali bonus) देण्याबाबत हात आखडता घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमध्ये ८६ हजार कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. तसेच दिवाळीच्या आधी आठ दिवस अगोदर बोनस दिला जात होता. परंतु यांदा कामगार संघटनांनी मागणी करूनही बोनस देण्याबाबत अवाक्षरही काढलेला नाही.

२०१९ ते २०२० या आर्थिक वर्षात सुमारे एक हजार कोटी रूपयांचा नफा झाला आहे. तरीही बोनस देण्याबाबत कंपन्या टाळाटाळ करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत उद्यापासून राज्यभर वीज कंपन्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन (agitation of power workers) करण्याचा निर्णय झाला आहे.