मोठी बातमी : मंत्रालयात अंधार, वीजपुरवठा खंडित,कर्मचाऱ्यांची धावपळ

मंत्रालयातील वीजपुरवठा अचानक खंडित झाल्यामुळं धावपळ उडालीय. मंत्रालयातील सचिवालय इमारतीच्या परिसरात अचानक लाईट गेल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडालीय. नरिमन पॉइंट या ठिकाणच्या रिसिव्हिंग पॉइंटवर व्होल्टेजचा दबाव अचानक वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचं सांगितलं जातंय. वीज विभागाचे इंजिनिअर सध्या वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम करत असून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होईल, असं सांगण्यात आलंय. 

    मुंबईत पुन्हा एकदा वीजेचा खेळखंडोबा सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय. यावेळी थेट मंत्रालयालाच याचा फटका बसलाय. गेल्या काही तासांपासून मंत्रालयातील वीज गायब झालीय.

    मंत्रालयातील वीजपुरवठा अचानक खंडित झाल्यामुळं धावपळ उडालीय. मंत्रालयातील सचिवालय इमारतीच्या परिसरात अचानक लाईट गेल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडालीय. नरिमन पॉइंट या ठिकाणच्या रिसिव्हिंग पॉइंटवर व्होल्टेजचा दबाव अचानक वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचं सांगितलं जातंय. वीज विभागाचे इंजिनिअर सध्या वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम करत असून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होईल, असं सांगण्यात आलंय.

    गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला अशाच प्रकारे मुंबईतील वीजपुरवठा अचानक गायब झाला होता. यामागे चीनचा सायबर हल्ला हे कारण असल्याचं एका आंतरराष्ट्रीय वृत्तसमूहानं म्हटलं होतं. मात्र केंद्र सरकारनं ही शक्यता फेटाळून लावली होती. आता पुन्हा एका मुंबईतील वीज गायब झाल्यामुळं खळबळ उडालीय.