After Mulund, Deonar and Kanjur dumping will also be stopped? BMC finds alternative Mumbai dumping ground free

देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकलेल्या कचऱ्याची आता टेकडी झाली आहे. कित्येक वर्षांपासून येथे कचरा डम्प केला जात आहे. त्या कचऱ्यावर वीजनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिकेने गेल्या २० वर्षांपासून कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. परंतु, हा प्रकल्प पुढेच सरकला नाही. आता ६०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबई पालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकणाऱ्या कचऱ्यातून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या देखभालीसह इतर कामांसाठी पालिकेने सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

    देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकलेल्या कचऱ्याची आता टेकडी झाली आहे. कित्येक वर्षांपासून येथे कचरा डम्प केला जात आहे. त्या कचऱ्यावर वीजनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिकेने गेल्या २० वर्षांपासून कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. परंतु, हा प्रकल्प पुढेच सरकला नाही. आता ६०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे.

    याशिवाय आणखी एका प्रकल्पावर काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी प्रारूप तयार करणे, निर्माण करणे आण संचालनांतर्गत प्रकल्पाची व्यवस्था व देखरेखसाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.

    यापूर्वी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानासा तलावातून वीज निर्मिती करण्याचा छोटा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहे. मध्य वैतरणा तलावात पालिका वीज निर्मितीच्या प्रकल्पावर काम करत आहे. परंतु, त्यासाठी कालावधी मात्र अद्याप निश्िचत करण्यात आलेला नाही.