मुंबईतील वीज पुरवठा खंडित :  मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तातडीने चौकशीचे आदेश

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईतील वीज गायब झाली असून एमएसईबी, बेस्ट आणि अदानीची वीज गेल्यामुळे मुंबई शहरातील कार्यालयांचा कारभारही ठप्प पडला आहे. याचा परिणाम लोकल सेवांवरही झाला असून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.सध्या काही ठिकाणी वीज पुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. वीज पुरवठा अचानक बंद झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा केली. त्याचसोबत मुंबईसह उपगनारांमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही, याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.