power grid failuer

मुंबई (Mumbai) आणि एमएमआर (MMR) रिजनमधील वीज पुरवठा (Power supply) खंडित झाल्याचा सर्वात मोठा फटका लोकल सेवा (Local service) , रुग्णालयांना (Hospitals) बसला आहे. तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक लोकल जागेवरच उभे राहिल्यामुळे प्रवाशी खोळंबले. तर रुग्णालयात कोविड रुग्ण (Covid Patients) असल्याने वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचं आव्हान होतं.

मुंबई : मुंबई (Mumbai) आणि एमएमआर (MMR) रिजनमधील वीज पुरवठा (Power supply) खंडित झाल्याचा सर्वात मोठा फटका लोकल सेवा (Local service) , रुग्णालयांना (Hospitals) बसला आहे. तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक लोकल जागेवरच उभे राहिल्यामुळे प्रवाशी खोळंबले. तर रुग्णालयात कोविड रुग्ण (Covid Patients) असल्याने वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचं आव्हान होतं.

मुंबईसह पश्चिम उपनगरातील वीज पुरवठा सुमारे अडीच तासांनी हळूहळू पूर्वपदावर आलं आहे. आणि पूर्व उपनगरातील नाहूर, भांडुप, मुलुंड, घाटकोपर इथला वीजपुरवठा अवघ्या १५ तासानंतर पूर्वपदावर सुरू झाला आहे. याशिवाय नवी मुंबईतील बेलापूर, खारघर, पनवेल, नेरुळ या भागातील वीजही परतली आहे.

तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे?

महापारेषणच्या कळवा-पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर आणि नवी मुंबईमधील वीज खंडित झाली. याच्या cascade effect मुळे मुंबई आणि मुंबई उपनगरातील वीज देखील खंडित झाली, अशी माहिती महावितरणने दिली.