Mumbai Power Cut Update : नवी मुंबई परिसरातील वीज पुरवठा सुरळीत; हार्बर मार्गावरील CSMT-पनवेल दरम्यानची लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर

पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाली होती. आज सकाळी नवी मुंबई परिसरातील सुमारे १० वाजल्यापासून खंडित झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे.

पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाली होती. आज सकाळी नवी मुंबई परिसरातील सुमारे १० वाजल्यापासून खंडित झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे. तसेच वीज पुरवठा सुरू झाल्याने हार्बर मार्गावरील सीएसएमटी-पनवेल दरम्यान धावणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत.आम्ही सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-कर्जत / कसारा दरम्यान सेवा पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुंबईहून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले असून येणाऱ्या गाड्यांच्या वेळातदेखील बदल झाले आहेत, असं मध्ये रेल्वेच्या सीपीआरओ (CPRO) ने सांगितलं आहे.

आज सकाळी १० वाजल्यापासून लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. दरम्यान, सध्या नवी मुंबई आणि दादर, ठाणे परिसरात वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. तसेच मुंबई सेंट्रल रेल्वेची मेन रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.