Mumbai Power Cut Update: पुढच्या एक तासांत वीज पुरवठा सुरू होईल, रुग्णालय आणि मुंबई लोकल सुरू करण्यासाठी पहिलं प्राधान्य

मुंबईः मुंबईत खंडित झालेल्या वीजपुरवठा येत्या १ तासात सुरळीत होणार आहे, अधीकारी व विद्युत कर्मचारी वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. मुंबईतील वीज गेल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईः मुंबईत खंडित झालेल्या वीजपुरवठा येत्या १ तासात सुरळीत होणार आहे, अधीकारी व विद्युत कर्मचारी वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. मुंबईतील वीज गेल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते.पुढच्या एक तासांत वीज पुरवठा सुरू होईल, रुग्णालय आणि मुंबई लोकल सुरू करण्यासाठी पहिलं प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई लोकल आणि रुग्णालयांमध्ये वीज पूर्ववत करण्यासाठी आमचं पहिलं प्राधान्य असेल, असंही ते म्हणाले आहेत. तसंच, महापारेषणच्या ४०० किलो कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

-तांत्रिक बिघाडाच्या कारणांची चौकशी करणार
वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणांमुळं तांत्रिक बिघाड झाला आहे त्याची चौकशी करण्यात येईल, असं आश्वासनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहे. तसंच, मुंबईतील ३० ते ४० टक्के भागांत वीज सुरळीत झाली आहे.ठाण्यात वीज आली असून उर्वरित काही भागांतही वीज पुन्हा पुर्ववत होईल, असंही ते म्हणाले.