Praful Patel Connection  with Iqbal Mirchi?

पटेल कुटुंबीयांची कंपनी आणि इक्बाल मिर्ची यांच्यात एक सौदा झाल्याचा आरोप आहे. या सौद्यानुसार मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्चीचा वरळी येथील एक भूखंड देण्यात आला होता. या भूखंडावरच मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली व्यावसायिक व रहिवासी इमारत उभारली आहे. ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी ईडी कार्यालयात हजेरी लावली. सोमवारी दुपारी ते ईडी कार्यालयात पोहोचले व त्यानंतर काही वेळाने निघून गेले. ईडीने अंडरवर्ल्ड गँगस्टर इक्बाल मिर्चीसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून ईडीने पटेल यांची काही मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही दस्तवेजांवर स्वाक्षरी करण्यासाठी ते सोमवारी ईडी कार्यालयात गेले होते.

    ईडी कार्यालयातून परत जात असताना त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत चर्चा केली. ईडीने काही मालमत्ता जप्त केली असून या संपत्तीच्या पुष्ट्यर्थ स्वाक्षरी करण्यासाठीच कार्यालयात गेलो असल्याची माहिती त्यांनी दिली.

    पटेल कुटुंबीयांची कंपनी आणि इक्बाल मिर्ची यांच्यात एक सौदा झाल्याचा आरोप आहे. या सौद्यानुसार मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्चीचा वरळी येथील एक भूखंड देण्यात आला होता. या भूखंडावरच मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली व्यावसायिक व रहिवासी इमारत उभारली आहे. ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

    वरळीचा जो भूखंड मिर्चीचा आहे त्याचे अंदाजित बाजारमूल्य 2000 कोटी रुपये असू शकते असे ईडीने कोर्टात सांगितले होते. मिर्चीचा 2013 मध्ये मृत्यू झाला होता.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]