पाच जिल्ह्यांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना प्रकाश आंबेडकरांनी घेतली राजकारणापासून तीन महिन्यांची सुट्टी, रेखा ठाकूर यांच्याकडे सोपवली पक्षाची धुरा

वंचित बहुजन आघाडीच्या(Wanchit Bahujan Aghadi) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत(Press Conference) अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)म्हणाले की, ''मी माझ्या व्यक्तिगत कारणासाठी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही.''

  मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या(Wanchit Bahujan Aghadi) महाराष्ट्राच्या प्रभारी अध्यक्षपदी रेखा ठाकूर(Rekha Thakur) यांची नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर(Prakash ambedkar Took 3 Months Leave) यांनी पत्रकारांना दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ”मी माझ्या व्यक्तिगत कारणासाठी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही.”

  पक्षाला अध्यक्ष असणे महत्वाचे
  ते म्हणाले की, पक्ष चालला पाहिजे. आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. या काळात वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रभारी अध्यक्षपदी रेखा ठाकूर यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा आंबेडकर यांनी केली. ते म्हणाले की, पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी रेखा ठाकूर यांना सहकार्य करून पक्षाचे कार्यक्रम राबवावेत.

  पाच जिल्ह्यांमधील निवडणुकांवर लक्ष
  आंबेडकर यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. या काळात डॉ. अरुण सावंत, वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि सर्व कार्यकर्त्यांनी प्रभारी अध्यक्ष रेखा ठाकूर यांना मदत करून पक्षाची विजयाच्या दिशेने वाटचाल करू या, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

  वंचित बहुजन आघाडीने ५ जुलैला मुस्लिम आक्षणाचा मुद्दा हाती घेत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दयावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने रझा अकादमीला सोबत घेत हे आंदोलन केले होते. यापुढे आता वंचित बहुजना आघाडीला राज्यातील पाच जिल्ह्यांमधील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.

  आंबेडकर यांची प्रकृती स्थिर
  बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून उद्या सकाळी अकरा वाजता माध्यमांना हेल्थ बुलेटिन देण्यात येईल, अशी माहिती प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सर्व आंदोलनांना यशस्वीपणे सुरू ठेवले जाईल. कोरोना आणि लॉकडाऊनच्या नावाखाली सरकारकडून सुरू असलेला भोंगळ कारभार वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी उघड केला असून जनतेच्या रोजगाराचे आणि आरोग्याचे प्रश्न भीषण बनत चालले आहेत. त्या विरोधात पक्ष सक्षमपणे आवाज उठवत राहू, असे त्या म्हणाल्या.