मराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग?

छत्रपती संभाजीराजें यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असलेल्या ऍड प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहूंचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांच्या नेतृत्वात राज्यात नव्या राजकीय आघाडीचे भाकीत आंबेडकर यानी केले होते. ते म्हणाले होते की राज्याचे राजकारण शिळे होत चालले आहे त्यात ताजेपणा आणण्यासाठी छत्रपती संभाजी राजे आणि आपण पुढाकार घेणार आहोत.

  मुंबई: मराठा समाजाला सामाजिक आर्थिक आरक्षण मिळावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारवर जनमताचा रेटा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना भाजप खासदार छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठी क्रांती मुक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

  यावेळी कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी होत असलेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या ‘सोशल  इंजिनीयरिंग’चा नवा प्रयोग म्हणून पाहिले जात आहे.

  छ्रत्रपती – शाहू- आंबेडकरांचे वंशज एकत्र

  छत्रपती संभाजीराजें यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असलेल्या ऍड प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहूंचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांच्या नेतृत्वात राज्यात नव्या राजकीय आघाडीचे भाकीत आंबेडकर यानी केले होते. ते म्हणाले होते की राज्याचे राजकारण शिळे होत चालले आहे त्यात ताजेपणा आणण्यासाठी छत्रपती संभाजी राजे आणि आपण पुढाकार घेणार आहोत.

  यानंतर पुणे ते मुंबई लाँग मार्च

  त्यानंतर प्रकाश आंबेडकर मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाला आणखी बळ मिळणार असून नवा सोशल इंजिनियरींगचा प्रयोग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे.

  कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करुन हे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार असून यानंतर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे.