मला कोणी कितीही ऑफर दिली तरी…  नक्की काय म्हणायचे प्रताप सरनाईकांना

माझ्यावर आरोपपत्र दाखल झालेले नाही. एका फिर्यादीने माझे नाव घेतल्याने मला ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. मी पळून जाणारा नाही. ईडीकडून जेव्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, तेव्हा मी नक्की जाणार आहे. मी काहीही गुन्हा केलेला नाही. मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे आज मी उभा आहे  असे म्हणत सरनाईक यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

मुंबई :  दिल्ली आणि महाराष्ट्राच्या संघर्षात माझा तानाजी झालाय. पण, ते तानाजी मालुसरे १६ व्या शतकातील होते. हा तानाजी २१ व्या शतकातला आहे. ते तानाजी रयतेचे रक्षण करताना धारातीर्थी पडले होते. पण, हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल, असे शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रताप सरनाईक आज सहकुटुंब प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले होते.

ही लढाई एकट्या प्रताप सरनाईकची नाही. ही लढाई संपूर्ण महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे फक्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नव्हे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मला पाठिंबा असल्याचा विश्वास दिला असल्याचे सरनाईक म्हणाले.

फिर्यादीने माझे नाव घेतल्याने चौकशीला बोलावले

माझ्यावर आरोपपत्र दाखल झालेले नाही. एका फिर्यादीने माझे नाव घेतल्याने मला ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. मी पळून जाणारा नाही. ईडीकडून जेव्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, तेव्हा मी नक्की जाणार आहे. मी काहीही गुन्हा केलेला नाही. मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे आज मी उभा आहे  असे म्हणत सरनाईक यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

ईडी चौकशीनंतर तुम्हाला भाजपच्या नेत्यांनी संपर्क केल्याची चर्चा आहे, याबाबत काय सांगाल? असा प्रश्न पत्रकारांकडून प्रताप सरनाईक यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना सरनाईक म्हणाले की, राज्यात पुढची पाच नव्हे तर २५ वर्ष महाविकास आघाडीचेच सरकार राहणार आहे. मला कोणीही कितीही ऑफर दिली तरी मी बाळासाहेंच्या विचारावर आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर चालणारा शिवसैनिक आहे आणि राहणार  असे ते म्हणाले.

ईडी भारतातील मोठी संस्था आहे. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण त्यांनी बाहेर काढली आहेत. त्यामुळे या संस्थेला तपासात आवश्यक ती सर्व मदत करायची ही, प्रताप सरनाईकची भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहिल असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.