ED team arrives at Shiv Sena MLA Pratap Saranaik's house,

प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने धाड टाकली त्यावेळी पाकिस्तानी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड सापडले. त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावला आहे. ईडीने याबाबत फेअरमाउंट बँक कॅलिफोर्नियाला पत्र लिहीत पाकिस्तानी क्रेडिट कार्डच्या संदर्भातील स्टेटमेंट मागवले आहे.

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचनालय(Enforcement Directorate) अर्थात ईडीने (ED) ने पुन्हा एकदा सरनाईक यांना समन्स बजावला असून १३ डिसेंबरपासून चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने धाड टाकली त्यावेळी पाकिस्तानी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड सापडले. त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावला आहे. ईडीने याबाबत फेअरमाउंट बँक कॅलिफोर्नियाला पत्र लिहीत पाकिस्तानी क्रेडिट कार्डच्या संदर्भातील स्टेटमेंट मागवले आहे.

या पाकिस्तानी क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे. पण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. हे कार्ड फेअरमाउंट, कॅलिफोर्निया (Fairmont Bank, California) इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.

२४ नोव्हेंबर रोजी ईडीच्या विशेष पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापेमारी केली. सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या १० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलगा विहंग याला चौकशीला बोलावले होते. पण, परदेशातून आल्यामुळे सरनाईक कुटुंबीय क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर सरनाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, १० डिसेंबर रोजी प्रताप सरनाईक यांची ईडीने सलग पाच तास चौकशी केली होती.