pratap sarnaik and kirit somayya

भाजप नेते डॉ. किरीट सोमैया(kirit somayya) यांचे सॉलिसीटर्स/वकील ध्रुव लीलाधर कंपनीने प्रताप सरनाईक (pratap sarnaik)यांच्या कायदेशीर नोटीशीला उत्तर दिले आहे.

मुंबई: भाजप नेते डॉ. किरीट सोमैया(kirit somayya) यांचे सॉलिसीटर्स/वकील ध्रुव लीलाधर कंपनीने प्रताप सरनाईक (pratap sarnaik)यांच्या कायदेशीर नोटीशीला उत्तर दिले आहे. प्रताप सरनाईक यांनी विहंग गार्डन, ठाणे येथे १३ मजली दोन अनधिकृत इमारती बांधल्या आहेत.  त्यांना अजूनपर्यंत वापर परवाना मिळालेला नाही. त्यातील फ्लॅटधारक हे बेहाल आहेत. याचा डॉ. किरीट सोमैया यांच्या वकिलांनी पुनरुच्चार केला आहे.

एनएसइएल घोटाळ्यात प्रताप सरनाईक त्यांचे भागीदार मोहित अग्रवाल सहभागी होते. NSEL घोटाळ्याच्या पैशातून टिटवाळा येथे प्रताप सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांच्या विहंग आस्था हौसिंग लि. कंपनीने ११२ मिळकती/जमिनी विकत घेतल्या. एम.एम.आर.डी.च्या १७५ कोटी घोटाळ्यामध्ये प्रताप सरनाईक व त्यांच्या पूर्ण परिवाराचे इडीद्वारा तपास चालू आहे.

डॉ. किरीट सोमैया यांनी प्रताप सरनाईक वरील उपरोक्त तिन्हीं आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. ध्रुव लीलाधर आणि कंपनीने प्रताप सरनाईक यांचे वकील अशोक  रघुनाथ कुलकर्णी यांना त्यांनी पाठविलेल्या १७ डिसेंबरच्या नोटीसला उत्तर दिले आहे. डॉ. किरीट सोमैया यांनी आधी प्रताप सरनाईक वर आरोप केले होते त्यात सत्यता आहे त्यातील कोणतेही आरोप मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रताप सरनाईक यांनी शंभर कोटीचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा सोमैयांना दिला होता. सोमैयांनी पुन्हा तिन्हीं आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.