ED team arrives at Shiv Sena MLA Pratap Saranaik's house,

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ( Shiv Sena MLA Pratap Saranaik ) यांनी ईडीकडून (ED)  तीन दिवसांची मुदत मागितली आहे. तसेच विहंगची पत्नी आजारी असल्यामुळे तिचा मेडिकल रिपोर्ट (Medical Report) ईडीकडे पाठवण्यात आला आहे. परंतु ईडीने अद्यापही प्रताप सरनाईक यांना तीन दिवसांच्या मुदतीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

मुंबई : मनी लॉड्रिंग केस ( Money laundering case ) प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ( Shiv Sena MLA Pratap Saranaik ) आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र विहंग सरनाईक ( Vihang Sarnaik ) यांना चौकशासाठी ईडीने गुरूवारी बोलावलं होतं. त्याआधी मंगळवारी ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं असता, ते पोहचू शकले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ( Shiv Sena MLA Pratap Saranaik ) यांनी ईडीकडून (ED)  तीन दिवसांची मुदत मागितली आहे. तसेच विहंगची पत्नी आजारी असल्यामुळे तिचा मेडिकल रिपोर्ट (Medical Report) ईडीकडे पाठवण्यात आला आहे. परंतु ईडीने अद्यापही प्रताप सरनाईक यांना तीन दिवसांच्या मुदतीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

टॉप्स ग्रूप सुरक्षा सेवे संबंधित प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर सरनाईक यांच्यासह विहंग सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु कोरोनाचे गाईडलाईन पाहिले असता, दोघांनीही एका आठवड्याची मुदत मागितली होती.

दरम्यान, काल किंवा आज त्यांची चौकशी होणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही घडले नाही. मात्र,आज अचानक पत्र पाठवून तीन दिवसांचा वेळ मागितला आहे.