pratap sarnaik shivsena

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यापाठी चौकशीचा ससेमिरा लागला आहे.  प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने धाड टाकली त्यावेळी पाकिस्तानी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड सापडल्याचे वृत्त प्रसारित झाले. सारनाईक यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही असे म्हणत त्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. सरनाईक यांनी प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया तसंच अभिनेत्री कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.

मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं आहे.असे ट्विट कंगनाने केले होते. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीचं बदनामी करणं चुकीचं आहे,” असा खुलासा प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची संपूर्ण देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कंगनाने रणौत यांनी माझ्याविरोधात खोटं ट्विट केलं. यामुळे कंगना रणौत तसंच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला असल्याचे सरनाईक यांनी सांगीतले.

त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केली असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.