प्रवीण दरेकर, महिलांची माफी मागा नाहीतर थोबाड रंगवू; रुपाली चाकणकरांचा थेट इशारा

राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची खेळी कायमच पहायला मिळत असते. यातच भाजपचे विधान परिषदेचे विरोेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रीय काॅंग्रेस प्रवेशावर टीका केली होती. दरम्यान आता प्रवीण दरेकर यांच्या टीकेवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

    मुंबई : राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची खेळी कायमच पहायला मिळत असते. यातच भाजपचे विधान परिषदेचे विरोेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रीय काॅंग्रेस प्रवेशावर टीका केली होती.

    दरम्यान आता प्रवीण दरेकर यांच्या टीकेवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या बोलण्यावरुन तुमची आणि तुमच्या पक्षाची संस्कृती दिसून आली. प्रविण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं आहे त्यामुळे तुुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवेल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

    प्रविण दरेकर तुम्ही वरिष्ठ सभागृहातील विरोधीपक्ष नेते आहात. हे ज्येष्ठांचं सभागृह आहे, मात्र तुमचा वैचारिकता आणि अभ्यासाशी दूरपर्यंत काही संबंध नसल्याचं दिसतं आहे, असं म्हणत चाकणकरांनी दरेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं असून व्हिडीओही शेअर केला आहे.

    दरेकर नेमकं काय म्हणाले होते?

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असल्याचं प्रविण दरेकर यांनी म्हटलं होतं. रुपाली चाकणकर यांनी केेलेल्या टीकेवर आता दरेकर काय उत्तर देतील हे पाहणं महत्वाचं ठरेल.