प्रविण दरेकरांनी राज ठाकरेंना दिला महत्वाचा सल्ला, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केलं आहे. पण या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील, असं दरेकर म्हणाले.

    मुंबई : राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केलं आहे. पण या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील, असं दरेकर म्हणाले.

    तसेचं आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असातनाच चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर पोहोचले आहेत. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशात भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.

    मनसे परप्रांतियांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत हे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जिवावर सत्ता येणार नाही. आमचा खूप जुना परिचय आहे. योग आला, तर त्यांना भेटेल. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.