प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी; अन्यथा गाल रंगवू : रूपाली चाकणकरांचा व्टिटरव्दारे इशारा

दरेकर बोलण्याच्या ओघात म्हणाले की, 'गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,' त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांना माफी मागण्याचा इशारा दिला आहे. 

    मुंबई (Mumbai) : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (BJP leader and Leader of Opposition) प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादीवर (the NCP) टीका करताना पुण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने वादंग निर्माण झाले आहे. या विधानाबाबत दरेकर यानी माफी मागावी; अन्यथा गाल रंगवू, असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष (NCP’s women state president) रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिला आहे.

    महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल रंगवू
    दरेकर बोलण्याच्या ओघात म्हणाले की, ‘गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांना माफी मागण्याचा इशारा दिला आहे.

    प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा.@mipravindarekar pic.twitter.com/T4CDp5jvFy


    दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा आम्ही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा’ असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. त्यांनी व्टिट करत प्रवीण दरेकर यांना हा इशारा दिला आहे. दरम्यान, वादाविषयी प्रविण दरेकर यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.