राजकारण नव्हे, शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय; प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला

संजय राऊत बोलतात त्याप्रमाण राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते. राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत हिच गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी याचा विचार करावा, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

    राजकारण हे चंचल असतं त्यामुळे २०२४ सालच्या निवडणुकीचे आडाखे तुम्ही काही आत्ताच बांधू शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलं. त्यावर आता राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारण हे कधीच चंचल नसतं, राजकीय नेते हे चंचल असतात. शिवसेनेची विचारधारा आता चंचल झालीय, अशी उपरोधिक टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.