पवारांचा नातू म्हणून त्यांना वेगळा न्याय का? कोविड सेंटरमधील रोहित पवारांच्या झिंगाट डान्सवर प्रवीण दरेकरांची टीका

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर नाच केला आहे.

    मुंबई : कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला(Covid Care Center) पीपीई किट न घालता किंवा कोविड प्रोटोकॉल न पाळता रोहित पवारांनी भेट दिली. तिथे जाऊन नाच केला. यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला असून “शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना(Rohit Pawar) दुसरा न्याय का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

    रोहित पवारांना पाठीशी घालताय का?

    राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर नाच केला आहे.

    या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, “रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले, डान्स केला. त्यामुळे ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकतात. सर्व सामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का?  कुणीही लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा नेता, त्यांनी करोना नियमांच गांभीर्य आणि भान ठेवलंच पाहिजे, अशी अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.