pravin darekar

सरकारने तातडीने तोडगा काढून रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावावेत आणि भाडे सदनिकाधारकांना मिळवून द्यावे, अशी आग्रही मागणी विधान परिषद विरोध पक्षनेते प्रविण दरकेर(Pravin Darekar Demand In Assembly Monsoon Session) यांनी सभागृहात केली.

    मुंबई : मुंबई व मुंबई उपनगरात रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकाधारकांना विकासकांकडून भाडे दिले जात नाही आणि घरही मिळत नाही.  सोन- नाणे गहाण ठेवुन, कर्ज काढून त्यांना भाडे भरावे लागत आहे, हे दुदैवी असुन सरकारने याबाबत तातडीने तोडगा काढून रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावावेत आणि भाडे सदनिकाधारकांना मिळवून द्यावे, अशी आग्रही मागणी विधान परिषद विरोध पक्षनेते प्रविण दरकेर(Pravin Darekar Demand In Assembly Monsoon Session) यांनी सभागृहात केली. सभापती महोदयांनी याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारला सर्व संबंधितांची तातडीने बैठक आयोजित करण्याचे निदेश दिले.

    रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावावे
    विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाविषयी असणाऱ्या समस्या सभागृहात मांडल्या. या संदर्भात दरेकर म्हणाले की, रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकाधारकांना विकासकांकडून भाडे दिले जात नाही. गरीब सर्वसाधारण मराठी कुटुंबातील, वर्षानुवर्षे मुंबईत रहाणारे आहेत. SRA चे पुनर्विकास होत आहे, तीन- चार वर्ष रहिवाश्यांना विकासकांकडून भाडे मिळत नाही. भाडेकरूचे भाडे थकल्यामुळे त्यांना त्रासाला सोमोरे जाव लागत आहे. शासनाने लक्ष देऊन भाडी मिळवून द्यावी व भाडेकरू बेघर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मत दरेकर यांनी सभागृहात मांडले.

    सरकारने याबाबत तातडीने तोडगा काढून रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावावेत आणि भाडे सदनिकाधारकांना मिळवून द्यावे, अशी आग्रही मागणी आज सभागृहात केली.