ईडी चौकशी आणि छापेमारीचा राजकारणाशी संबंध लावणे चुकीचे, प्रविण दरेकरांनी केलं स्पष्ट

एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई(Action By ED) होत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar Reply To Eknath Khadse) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 

    मुंबई : ईडी चौकशी(ED Inquiry) आणि छापेमारी यांचा संबंध राजकारणाशी लावणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई(Action By ED) होत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar Reply To Eknath Khadse) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

    तपास यंत्रणा स्वायत्त
    खडसे यांनी कारवाईमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे असा आरोप केला त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, ईडीची कारवाई कोणत्याही सुडभावनेने होत नसते. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषयापासून पळ न काढता खडसे यांनी चौकशीला समोरे जायला हवे.

    चौकशीला सहकार्य करणे उत्तम
    कुठलीही व्यक्ती चौकशीपासून पळ काढुन आपल्या  बचावाकरीता मार्ग शोधत असते. तेव्हा या सर्व प्रकरणातुन संशयाला बळकटी मिळते. आपला जर दोष नसेल तर योग्य ती कागदपत्र सादर करून आपले निर्दोषत्व सिद्ध करत कोणत्याही चौकशीला सहकार्य करणे उत्तम ठरेल असे मत दरकेर यांनी व्यक्त केले.