pravin darekar

धनंजय मुंडे(dhanajay munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार(sharad pawar) यांनी हे प्रकरण गंभीर आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे मंत्री मुंडे यांनी तात्काळ राजीनामा देणं अपेक्षित आहे, असं मत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.

दरेकर पुढे म्हणाले, “धनंजय मुंडे प्रकरणी राष्ट्रवादीची सुरुवातीची भूमिका चाचपडणारी होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ती मांडली होती. मात्र शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असेल आणि संबंधित महिलेनं मोठे आरोप केले आहेत तर त्याची सिद्धता होईलच. राजकारणात शेवटी नितीमुल्य आणि नैतिकतेला फार महत्व आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, याआधीही असे प्रकार झाल्यावर संबंधित मंत्र्यांकडून राजीनामे घेण्यात आले आहेत. शिवशाही सरकार असतानाही काही मंत्र्यांवर आरोप झाले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे राजीनामे घेतले होते. बाळासाहेबांचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांनीही तशीच भूमिका घेतली पाहिजे. कारण आता पवारांची भूमिकापण स्पष्ट आहे.

धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा. ते जर चौकशीत निर्दोष सापडले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल. ही माझी, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांचीही भूमिका आहे, असे दरेकर म्हणाले.