गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम संजय राऊत करत आहेत – प्रविण दरेकर

शिवसेना(Shivsena) आता गुन्हेगारीचे समर्थन करायला लागली आहे का ? संजय राऊत(Sanjay Raut) एका बाजूला कायद्याच्या गोष्टी करणार आणि दुसऱ्या बाजूला कायदा ज्यांनी हातात घेतला त्यांना खुलेआम माध्यमांसमोर उभे करणार. मला वाटते, संजय राऊत खऱ्या अर्थाने कायदा मानत नाहीत. ज्यांनी अशी प्रवृत्ती केली, गुंडगिरी केली त्यांना आपण पाठीशी घालत आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या एका वेळेला दोन भूमिका ठरू शकत नाहीत, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.

    मुंबई :एका बाजूला कायद्याचे राज्य, सर्वांना समान कायदा असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला कायदा हातात घेणाऱ्यांना सुरक्षा द्यायची, अशी दुटप्पी भूमिका संजय राऊत(Sanjay Raut) घेत असून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम संजय राऊत करत असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी केली आहे.

    नाशिकमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर आणि नगरसेविकेचे पती बाळा दराडे आज खासदार संजय राऊत यांच्याबरोबर दिसले. या दोघांवर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलीस त्यांचा गेले दोन दिवस शोध घेत आहेत आणि ते राऊत यांच्याबरोबर फिरताना आज दिसून आले आहेत. यावर दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून ते म्हणाले, शिवसेना आता गुन्हेगारीचे समर्थन करायला लागली आहे का? संजय राऊत एका बाजूला कायद्याच्या गोष्टी करणार आणि दुसऱ्या बाजूला कायदा ज्यांनी हातात घेतला त्यांना खुलेआम माध्यमांसमोर उभे करणार. मला वाटते, संजय राऊत खऱ्या अर्थाने कायदा मानत नाहीत. ज्यांनी अशी प्रवृत्ती केली, गुंडगिरी केली त्यांना आपण पाठीशी घालत आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या एका वेळेला दोन भूमिका ठरू शकत नाहीत, अशी टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.

    नंतर हिंदुत्वाचं काय झालं हे राऊतांनी सांगावं….
    हिंदुत्वासाठी या पक्षाने मोठे काम केले आहे. आम्ही २५ वर्षे त्यांच्यासोबत होतो. त्यांचे योगदान आम्ही जाणून आहोत, असे म्हणत अनेक जुन्या आठवणीना संजय राऊत यांनी आज उजाळा दिला. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, जुन्या आठवणीना सोयीने उजाळा देऊन काही फायदा नाही. हिंदुत्वाची अभेद्य अशी वज्रमूठ शिवसेना आणि भाजपची होती. अशा प्रकारच्या आठवणी करत असताना मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे याची कल्पना संजय राऊत यांना नाही का? असा सवाल करत दरेकर म्हणाले, हिंदुत्वाच्या विरोधात असणाऱ्या विचारधारेवर महाविकास आघाडी सरकारशी युती केली गेली त्यावेळी पुढाकार घेणारे संजय राऊतच होते त्यामुळे हिंदुत्वाची आठवण करत असताना नंतर हिंदुत्वाचे काय झाले हे राऊतांनी सांगितले पाहिजे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.