
मुंबई :आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मुंबईत खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट करून घेणे शक्य होणार आहे. आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यास डॉक्टरची चिठ्ठी लागत होती. यापुढे मात्र डॉक्टरची चिठ्ठी लागणार नसल्याचे
मुंबई :आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मुंबईत खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट करून घेणे शक्य होणार आहे. आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यास डॉक्टरची चिठ्ठी लागत होती. यापुढे मात्र डॉक्टरची चिठ्ठी लागणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. यामुळे आता लॅबपर्यंत न जाता नमुने घेण्यासाठी लॅबवाल्यांना घरी बोलावता येणार आहे. परंतु यासाठी एक हमीपत्र द्यावे लागणार आहे. एखाद्याला ५ दिवसांच्या आत लक्षणे जाणवली तर त्याला हमी पत्रावर आपली टेस्ट करून घेता येणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील तसेच जोखमीच्या संपर्कातील व्यक्तीला पाचव्या आणि दहाव्या दिवशी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला देणे हे लॅबोरेटरीसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असल्यास बाधित रुग्णाच्या संपर्कात राहून पालिका त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे.