Pressure from the Union Minister's office to find the buffaloes, officials removed all the premises

गोरेगावमधील आरेच्या युनिट क्रमांक २५ मधील एका तबेल्यातून दोन म्हशी चोरीला गेल्या आहेत. अशी तक्रार मालकाने आरे पोलिसांना दिली आहे. मालकाने या दोन्ही म्हशींची किंमत ३ लाख असल्याचे सांगितले आहे.

मुंबई : मुंबईमतील गोरेगाव येथील आरेमधील तबेल्यातून २ म्हशींची (Stealing buffaloes) चोरी झाल्याची शक्यता आहे. या म्हशींच्या मालकाने म्हशींना शोधण्यासाठी पोलिसांत तक्रार दिली आहे. तबे

ल्यातील म्हशी १ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. अजूनही या म्हशींचा पत्ता लागत नसल्याने मालकाने केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातून राजकीय दबाव पोलिसांवर (Pressure from the Union Minister)  आणला आहे. अशी माहिती मिळाली आहे.

१ डिसेंबर २०२० रोजी गोरेगावमधील आरेच्या युनिट क्रमांक २५ मधील एका तबेल्यातून दोन म्हशी चोरीला गेल्या आहेत. अशी तक्रार मालकाने आरे पोलिसांना दिली आहे. मालकाने या दोन्ही म्हशींची किंमत ३ लाख असल्याचे सांगितले आहे. तसेच या म्हशींची चोरी रात्रीच्या सुमारास १२ ते ३ च्या दरम्यान झाल्याचे सांगितले आहे. म्हशीच्या शोधासाठी तपास अधिकाऱ्यांनी सर्व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पिंजुन काढली आहे. तरीही म्हशींचा अद्याप ठावठिकाणा लागला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार म्हशींच्या मालकाने केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातून तपास अधिकाऱ्यांवर म्हशींना शोधण्यासाठी दबाव आणला आहे. परंतु या मंत्र्याचे नाव मात्र गुलदस्त्यात आहे. आधिच कोरोना परिस्थितीत पोलीस कामगिरी बजावत आहेत. त्यातच हा नसता ताप पोलिसांच्या डोक्याला झाला आहे.