इजिप्तचा कांदा भारतात दाखल होताच भाव गडगडले, ग्राहकांना मोठा दिलासा

बाजारात कांदा शंभरीवर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात कांद्याने अश्रू आणले होते. बाजारपेठेत जुना कांदा संपत आल्याने तर नवीन कांद्याची आवक न झाल्याने दर वाढतानाच दिसत होता. म्हणून ग्राहकांनीही कांदा खरेदीकडे पाठ फिरवली होती. फक्त गरजेपुरती कांदा खरेदी करत होते. मागील महिन्यात कांद्याचे दरात घट झाली होती.

मुंबई : कांद्याने मागिल काही महिन्यांपासून उच्चांक गाठला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना कांद्याने चांगलेच रडवले होते. शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या कांद्याचे दर आता कोसळले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला (big relief to consumers) आहे. भारतीय बाजारात इजिप्त आणि तुर्कस्तानाच्या कांद्याचे (Egyptian onions) आवक झाली आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने कांद्याचे दर कमी झाले आहेत. परंतु यामध्येही विदेशी कांदा खरेदीपेक्षा भारतीय कांद्याकडे ग्राहकांचा जास्त कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

बाजारात कांदा शंभरीवर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात कांद्याने अश्रू आणले होते. बाजारपेठेत जुना कांदा संपत आल्याने तर नवीन कांद्याची आवक न झाल्याने दर वाढतानाच दिसत होता. म्हणून ग्राहकांनीही कांदा खरेदीकडे पाठ फिरवली होती. फक्त गरजेपुरती कांदा खरेदी करत होते. मागील महिन्यात कांद्याचे दरात घट झाली होती. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरही कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची कांदा खरेदी करण्याची क्षमता वाढल्याचे दिसून आले.

इजिप्त आणि तुर्कस्तानवरुन आलेल्या कांद्याचे दर २५ ते ३५ रुपय किलोवर आहेत. त्यामुळे भारतीय कांद्याचे दर कमी झाले असल्याचे समजते आहे. परंतु परदेशी कांद्यामुळे भारतीय कांद्याचे दर कमी झाले असल्याने ग्राहक भारतीय कांदा खरेदी जास्त प्रमाणात करत असल्याचे दिसते आहे.