महाराष्ट्रात मास्कच्या किमती ठरल्या, अवघ्या काही रुपयांत होणार उपलब्ध

उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर मास्कच्या कमाल किंमती ठरण्यासाठी राजद्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्यांनी सादर केलेल्या शिफारसीनुसारच यापुढे राज्यात मास्कचे दर लागू होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार एन-९५ मास्क येत्या काळात बाजारात १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होतील,

मुंबई : कोरोनाचे संकट जगावर आलेले असताना, मास्क हा प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग झआला हे. कोरोनापासून संरक्षणासाठी मास्कचा वापर आणि सॅनिटायझर या दोन गोष्टी सध्या प्रत्येकाच्या घरात, बॅगमध्ये पाहायला मिळतायेत. मात्र मास्कची वाढती मागणी लक्षात घेता, त्याची मनमानी किंमत दुकारनदारांकडून वसूल केली जात होती. मास्कच्या वाढत्या किमंतीबाबत वारवंरा आवाज उठवण्यात आल्यानंतर, राज्य सरकारने आता मास्कच्या किमती निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्कच्या किमंती निश्चित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

या असतील मास्कच्या किमती

उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर मास्कच्या कमाल किंमती ठरण्यासाठी राजद्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्यांनी सादर केलेल्या शिफारसीनुसारच यापुढे राज्यात मास्कचे दर लागू होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार एन-९५ मास्क येत्या काळात बाजारात १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होतील, तर डबल आणि ट्रिपल लेयरचे मास्क हे ३ ते ४ रुपयांना मिळणार आहेत. मास्कसोबतच येत्या काळात सॅनिटायझरच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे.