कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे पंतप्रधान मोदींना सोयरसुतक नाही; मात्र देशाला गडकरी पंतप्रधान हवेत : नाना पटोले याची मागणी

मोदींसमोर नितीन गडकरींचे किती चालते ते ठाऊक नाही, पण आम्हाला वाटते की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचे अशी चर्चा सुरू आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे, की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय

    मुंबई: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचे सर्वच स्तरातून टीका होत आहे. अश्यातच  भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतो. देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयरसुतक नाही, त्यासाठी गडकरीच पंतप्रधान हवे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

    नितीन गडकरी यांनी कोरोना लसीच्या वाढत्या मागणीवरुन दहा कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन नाना पटोले यांनी टोमणा लगावला. नाना पटोले म्हणाले, मोदींसमोर नितीन गडकरींचे किती चालते ते ठाऊक नाही, पण आम्हाला वाटते की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचे अशी चर्चा सुरू आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे, की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतो. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतेही मागितली होती. म्हणून आनंद आहे, असेही नाना पटोले म्हणाले.