देशात जातनिहाय जनगणना करायला पंतप्रधान तयार होतील : नवाब मलिक

देशातील अनेक पक्ष जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी करत असून पंतप्रधान यावर तयार होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

    मुंबई : देशातील अनेक पक्ष जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी करत असून पंतप्रधान यावर तयार होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतर पक्षांचे प्रमुख नेते जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावर बोलताना नवाब मलिक यांनी वरील मत व्यक्त केले आहे.

    दरम्यान संसदेच्या पटलावर गृहमंत्र्यांनी देशात जनगणना होणार नाही असे स्पष्ट केले आहे. जर देशातून मागणी असेल तर इम्पिरिकल डेटा गोळा करायला मदत होईल. शिवाय ओबीसींचे अनेक प्रश्न त्यामुळे सुटतील असेही नवाब मलिक म्हणाले. मागच्या सरकारनेसुध्दा जातनिहाय जनगणना करण्याचे सुचवले होते याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.