Prime Minister Modi forgets Maharashtra; 1000 crore aid to Gujarat

चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे वादळ सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरातचा दौरा केला. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही टीका केली आहे. महाराष्ट्रालाही वादळाचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?, असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. चक्रीवादळामुळे चार राज्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र मोदी यांनी केवळ गुजरातला तातडीने एक हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे उर्वरित राज्यांचे काय, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.

    मुंबई : चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे वादळ सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरातचा दौरा केला. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही टीका केली आहे. महाराष्ट्रालाही वादळाचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?, असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. चक्रीवादळामुळे चार राज्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र मोदी यांनी केवळ गुजरातला तातडीने एक हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे उर्वरित राज्यांचे काय, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.

    नवाब मलिक यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबाबतचा हा भेदभाव नाही का?, असा सवाल मलिक यांनी केला आहे.

    चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. ते पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली असेल म्हणूनच मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावेत, असे म्हणत त्यांनी मोदींच्या गुजरात दौऱ्यावर टीका केली आहे.

    राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या वतीने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज गुरुवारी कोकणातील तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.