धारावीतील खाजगी डॉक्टर्स लोकांच्या सेवेत रुजू

200 दवाखाने उघडले मुंबई : कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धारावीत पसरला आहे.ज्यामुळे धारावीतील खाजगीडॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. यामुळे किरकोळ आजार असणाऱ्या

२०० दवाखाने उघडले

मुंबई :  कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धारावीत पसरला आहे.ज्यामुळे धारावीतील खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. यामुळे किरकोळ आजार असणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.अखेर महानगरपालिकेने डॉक्टरना सुरक्षा साधने पुरविण्यास सुरुवात केल्याने खाजगी डॉक्टर पुन्हा लोकांच्या सेवेत गुरुवार पासून रुजू झाले आहेत.

धारावीतील सुमारे ३०० पैकी २०० डॉक्टरांनी आपले दवाखाने खुले केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.यामुळे किरकोळ आजाराकरिता मदत होण्याची शक्यता आहे.

धारावीत कोरोनाचे रुग्ण एका पाठोपाठ मिळू लागल्याने खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले. यामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी या आजारांच्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. काही मोजकेच डॉक्टर या कालावधीत दवाखाने खुले करत होते. यामुळे या डॉक्टरांकडे उपचारासाठी मोठी गर्दी होत होती. काही डॉक्टरांनी याचा फायदाही उठवला.

अनेकांकडून जादा शुल्क वसूल केले. रुग्णांची गैरसोय होत असल्याने त्यांना पालिकांच्या रुग्णालयांत जावे लागत होते. यामुळे जवळच असलेल्या सायन हौस्पिटल वर मोठा ताण पडत होता.

कोरोनाबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जेष्ठ डॉक्टरांनी अद्यापही दवाखाने बंद ठेवले आहेत. तर ५० हुन कमी वय असलेले डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले आहेत. त्यांना महानगरपालिकेकडून पीपीई किट देण्यात येत असल्याने अनेक डॉक्टर पुन्हा दवाखाने उघडू लागले आहेत. यामुळे किरकोळ आजार असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळू लागला आहे.

माहीम धारावी मेडिकल असोसिएशनचे धारावीत सुमारे ३०० सदस्य आहेत. यामध्ये जेष्ठ डॉक्टरांची संख्या अधिक आहे. त्यांना रक्तदाब आणि इतर आजार असल्याने या डॉक्टरांनी दवाखाने उघडले नाहीत. सध्या धारावीत २०० हुन अधिक दवाखाने सुरू झाले असल्याचे, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एस शिंगणापूरकर यांनी सांगितले