खासगी रुग्णालयांना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून लसी विकत घ्याव्या लागणार, केंद्र सरकार देणार नाही; राज्य सरकारचा निर्णय

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ लस देण्याची घोषणा करताना राज्य सरकारने लस उत्पादकांशी थेट संपर्क साधून त्यांच्याकडून लस खरेदी करावी अशी मुभा दिली होती.

    मुंबई : कोविशिल्ड या कोविड-१९वरील लसीची खासगी रुग्णालयांसाठी व राज्य सरकारांसाठीची किंमत सिरम इन्स्टिट्यूटने बुधवारी निश्चित केली. त्यानुसार खासगी रुग्णालयात ही लस ६०० रु. प्रती डोस व राज्य सरकारला ४०० रु. प्रति डोसने विकली जाणार आहे.

    दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ लस देण्याची घोषणा करताना राज्य सरकारने लस उत्पादकांशी थेट संपर्क साधून त्यांच्याकडून लस खरेदी करावी अशी मुभा दिली होती.

    सिरमने येत्या दोन महिन्यात आपल्या लसीचे उत्पादनही वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. आमच्या एकूण लसींपैकी ५० टक्के लसी केंद्राच्या लसीकरण मोहिमेला देण्यात येणार असून उर्वरित ५० टक्के लसी राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना देण्यात येणार असल्याचे सीरमने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. येत्या चार ते पाच महिन्यात आपली लस रिटेल व मुक्त व्यापारासाठी उपलब्ध नसेल असेही सिरमने स्पष्ट केले आहे. कॉर्पोरेट व खासगी आस्थापनांनी आपल्या लसी राज्य सरकार व अन्य खासगी आरोग्य व्यवस्थेंच्या मार्फत खरेदी कराव्यात असेही सीरमने म्हटले आहे.

    इंडियन एक्स्प्रेसने १ मे नंतर कोविशिल्ड लसीसाठी प्रत्येकाला नेमके किती पैसे मोजावे लागणार आहेत याची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या नुसार सीरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारना ४०० रु. व खासगी रुग्णालयांना ६०० रु. प्रती डोस किंमतीने लस विकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकाला लसीचे दोन डोस घ्यायचे असून जी व्यक्ती सरकारी रुग्णालयातून लसीचे दोन डोस घेईल तिला ८०० रु. व खासगी रुग्णालयातून घेतल्यास १२०० रु. इतके पैसे द्यावे लागणार आहे.