प्रेयसीच्या महागड्या गिफ्टपायी पटकथा लेखकाला घडली तुरूंगवारी

आपल्या प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी इतर लोकांसोबत आर्थिक फसवणूक करत होता. परिणामी ओशिवरा पोलिसांनी सापळा रचू

मुंबई:  आपल्या प्रियसीला महागडे गिफ्ट देण्यासाठी लोकांची ऑनलाईन फसवणूक(online fraud) करणाऱ्या पटकथा लेखकाला (writer ) मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुभम पीताम्बर साहू असं या २८ वर्षीय लेखकाचे नाव आहे. हा व्यक्ती आपल्या प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी इतर लोकांसोबत आर्थिक फसवणूक करत होता. परिणामी ओशिवरा पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. सध्या पोलीस या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहेत.

या लेखकाची प्रेयसी एक युट्यूबर आहे. युट्यूब कॉन्टेटसाठी ती विविध शहरांना भेट देत असे. दरम्यान यासाठी लागणारी आर्थिक मदत आरोपी व्यक्ती करत होता. परंतु लॉकडाउनमुळे त्याचीही आर्थिक स्थिती ढासळली. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. परिणामी त्याने ऑनलाईन फसवणूकीचा मार्ग निवडला.

अलिकडेच त्याने मुंबईतील एका टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीसोबत फसवणूक केली. त्याने या कंपनीला खोटे मेसेज दाखवून जवळपास ३२ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली. चौकशीदरम्यान अशा प्रकारे त्याने अनेकांसोबत फसवणूक केल्याची माहिती समोर आली. सध्या पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.