शिक्षण सेवकांच्या ६१०० रिक्त जागा भरण्यासाठी येत्या महिनाभरात सामान्य प्रशासन विभागाकडून प्रक्रिया : वर्षा गायकवाड

येत्या १५ जुलै पासून राज्यातील लोरोनामुक्त गावात  आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग निर्बंधाचे पालन करत सुरू करण्याबाबत तयारी केली जात असून याबाबत येत्या आठवड्यात आढवा घेतला जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

    मुंबई : राज्यात शिक्षण सेवकांच्या ६१०० रिक्त जागा भरण्यासाठी येत्या महिनाभरात सामान्य प्रशासन विभागाकडून प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की गेल्या अनेक महिन्यांपासून ही रिक्त पदे असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक त त्वांचा विचार करत या जागा भरण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेवून प्रक्रिया करण्यात येणार आहे.

    येत्या १५ जुलै पासून राज्यातील लोरोनामुक्त गावात  आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग निर्बंधाचे पालन करत सुरू करण्याबाबत तयारी केली जात असून याबाबत येत्या आठवड्यात आढवा घेतला जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

    Procedure from General Administration Department to fill 6100 vacancies of shikshan sevaks in the coming month says Varsha Gaikwad