Serious allegations of sexual abuse in sajid khan

भारतीय मॉडेल पॉलाने म्हटले आहे की, जेव्हा #metoo चळवळ सुरु झाली, अनेकांनी साजिद खानबाबत वक्तव्य केले. पण अनेक कलाकारांप्रमाणेच माझाही कुणी गॉडफादर नव्हता त्यामुळे माझी हिंमत झाली नाही. आणि कुटुंबासाठी मला कमवायचे होते म्हणून मी शांत राहिले.

मुंबई : भारतीय मॉडेलने (Model) निर्माता दिग्दर्शक साजिद खान (sajid khan) याच्यावर लैंगिक शोषणचा गंभीर आरोप केला आहे. (Serious allegations of sexual abuse) या मॉडेलचे नाव पॉला आहे. लैंगिक शोषण केल्याचा आरोप साजिद खानवर केल्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. पॉलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आरोप केला आहे. लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपण्याआधी मी बोलणे आवश्यक आहे असे या मॉडेलने म्हटले आहे.

भारतीय मॉडेल पॉलाने म्हटले आहे की, जेव्हा #metoo चळवळ सुरु झाली, अनेकांनी साजिद खानबाबत वक्तव्य केले. पण अनेक कलाकारांप्रमाणेच माझाही कुणी गॉडफादर नव्हता त्यामुळे माझी हिंमत झाली नाही. आणि कुटुंबासाठी मला कमवायचे होते म्हणून मी शांत राहिले. आता माझ्याबरोबर माझे आई-वडील नाही आहेत. मी आता माझ्यासाठी कमवत आहे. त्यामुळे मी आता याबाबत भाष्य करण्याची हिंमत करु शकते.

 

View this post on Instagram

 

🙏🏼 Before democracy dies and there is no freedom of speech anymore I thought I should speak !

A post shared by Dimple paul (@paulaa__official) on


साजिज खान याने मला वयाच्या १७ व्या वर्षी त्रास दिला होता. असा गंभीर आरोप करत तिने म्हटले आहे की, साजिद खान माझ्याशी अश्लिल बोलायचा, मला कुठेही स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. त्याने आगामी हाऊसफुल्ल सिनेमात काम करण्यासाठी त्याच्यासमोर कपडे उतरवावे लागतील असे म्हटले होते. तसेच पॉलाने पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, त्याने आणखी कुणाला ना कुणाला अशी वागणूक दिली आसेल. अशा आशयाची पोस्ट करत तिने त्याच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच या घटनेचा मोठा परिणाम लहान असल्यामुळे झाला होता. तसेच केवळ कास्टिंग काऊचसाठी नाही तर तुमचे स्वप्न हिसकावून घेतल्यामुळे असे नराधम गजाआड असले पाहिजेत.

मॉडेलच्या या पोस्टमुळे दिग्दर्शक साजिद खान याला सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे. त्याच्या अटकेची मागणी सोशल मिडीयावर केली जत आहे.