मराठी म्हणून घर घेण्यास मिरारोड मध्ये मज्जाव…नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मीरारोड येथील शांतीनगर सेक्टर ७ मध्ये राहणारे रिंकू संगोई देढिया यांनी त्यांचा फ्लॅट विकण्यासाठी फेस बुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी फक्त गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाच्या लोकांसाठी असल्याचे नमूद केले आहे.मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी त्यांना फेसबुकवर दिलेल्या मोबाईल वर संपर्क साधला असता त्यांनी मराठी कुटुंबाला जागा विकण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.

  मीरा-भाईंदर: मिरारोड मध्ये मराठी माणसाला घर खरेदी करण्यास मज्जाव करण्याऱ्या विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात प्रांत वाद,भाषा वाद,धार्मिक तेढ निर्माण करणे,१५३ अ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मीरारोड येथील शांतीनगर सेक्टर ७ मध्ये राहणारे रिंकू संगोई देढिया यांनी त्यांचा फ्लॅट विकण्यासाठी फेस बुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी फक्त गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाच्या लोकांसाठी असल्याचे नमूद केले आहे.मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी त्यांना फेसबुकवर दिलेल्या मोबाईल वर संपर्क साधला असता त्यांनी मराठी कुटुंबाला जागा विकण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.

  आमच्या सोसायटीचा गुजराती,मारवाडी, जैन लोकांनाच फ्लॅट विकावा असा कायदा असल्याचे त्यांनी सांगितले,त्यामुळे गोवर्धन देशमुख यांनी त्यांचे सहकारी प्रदीप सामंत, सचिन घरत यांच्यासह जाऊन नयानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात त्यांनी सदर व्यक्ती प्रांतिक,भाषिक व धार्मिक वाद पसरवणे महाराष्ट्र राज्यात मराठी भाषिक व्यक्तीला संपत्ती खरेदी करण्या पासून वंचित ठेवणे व रोखणे असे करणाऱ्या रिंकू संगोई देढिया याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार अखेर १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  पूर्ण शांती नगर परिसर गुजराती आहे व आम्ही ज्या इमारती मधील सदनिका विकत आहोत त्या इमारती मध्ये सर्व गुजराती मारवाडी आहेत त्यामुळे तशी जाहिरात आम्ही दिली.
  मीनल देढिया(सदनिका मालक)

  मीरा रोडमध्ये मराठी माणसांना घरे नाकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, पुढील काळात राज्यात कुठेही मराठी माणसांना घरे नाकारल्यास अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जातील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितलं.