ही पोरं तर लहान आहेत, कुठून अभ्यास करणार, कशा परीक्षा देणार हे माहिती नाही. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी सोमवारी चर्चा केली.
ही पोरं तर लहान आहेत, कुठून अभ्यास करणार, कशा परीक्षा देणार हे माहिती नाही. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
एमपीएसी परीक्षा कितीवेळा पुढे ढकलल्या. लक्ष कशावर द्यायचं, मलाही कळेना. मुलांची वयं वाढत आहेत, तसे ते परीक्षा देऊ शकणार नाहीत. कोणाकडे याचे उत्तर आहे माहिती नाही. मात्र, सध्या दोन्ही सरकारने आरोग्यावर लक्ष द्यावं, असंही राज ठाकरेंनी सुचवलं आहे.