प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबईत मागील वर्षीच्या मार्च महिन्यांत कोरोनाने शिरकाव केला. यावेळी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बेस्ट कर्मचा-यांना प्रतिदिन ३०० रुपये कोविड भत्ता सुरु करण्यात आला. याची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत होती. मात्र २३ जून २०२० नंतर कर्मचा-यांना कोविड भत्ता देण्यात आलेला नाही.

    मुंबई (Mumbai).  मुंबईत मागील वर्षीच्या मार्च महिन्यांत कोरोनाने शिरकाव केला. यावेळी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बेस्ट कर्मचा-यांना प्रतिदिन ३०० रुपये कोविड भत्ता सुरु करण्यात आला. याची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत होती. मात्र २३ जून २०२० नंतर कर्मचा-यांना कोविड भत्ता देण्यात आलेला नाही.

    त्यामुळे थकीत कोविड भत्ता तातडीने देण्यात यावा व जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही, तोपर्यंत भत्ता सुरु ठेवण्यात यावा अशी मागणी दि बीईएसटी वर्कर्स युनियनने केली आहे.

    कोरोना विरोधात अद्याप लढा सुरु असून बेस्ट कर्मचा-यांनी जीव धोक्य़ात घालून काम केले आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व यंत्रणा बंद होती. यावेळी बेस्ट कर्मचा-यांनी दिवसरात्र काम केले. नवी मुंबई, ठाणे, बदलापूर ते विरारपर्यंत राहणारे कर्मचा-यांनी दिवसरात्र सेवा बजावली. लॉकडाऊनमुळे अनेकांना घरी जाता आले नाही. या कालावधीत बेस्ट प्रशासनाने दैनंदिनी ३०० रुपये कोविड भत्ता सुरु केला. याची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत होती.

    जून २०२० पर्यंत हा भत्ता देण्यात आला. मात्र त्यानंतरचा भत्ता अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचा-यांना लागू झालेला ३०० रुपये प्रमाणे थकीत कोविड भत्ता तातडीने देण्यात यावा अशी मागणी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केली आहे. दरम्यान सध्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही तोपर्यंत कोरोना भत्ता सुरु ठेवावा अशी मागणीही युनियनने केली आहे.