मालमत्ता कर प्रणाली २५ ऑगस्ट मध्यरात्री पर्यंत बंद

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीचे क्लाऊड मायग्रेशनचे काम पूर्ण झाले आहे. क्लाऊड मायग्रेशन नंतरच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने मालमत्ता कर प्रणाली उद्या बुधवार २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

    मुंबई : महानगरपालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीचे क्लाऊड मायग्रेशनचे काम पूर्ण झाले आहे. क्लाऊड मायग्रेशन नंतरच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने मालमत्ता कर प्रणाली उद्या बुधवार २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

    गुरुवार २६ ऑगस्ट पासून ही प्रणाली पुन्हा कार्यान्वित होणार आहे.मालमत्ता कर प्रणाली बंद असल्याच्या कालावधीत, प्रशासकीय विभागातील नागरी सुविधा केंद्र तसेच एनईएफटी व्यतिरिक्त इतर ऑनलाईन अधिदान इत्यादी सुविधा उपलब्ध राहणार नाहीत. या कालावधीत नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने दिलगिरी व्यक्त करण्यात येत असल्याचे पालिकेने कळविले आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]