‘स्पुटनिक’च्या पुरवठ्यासाठी थेट रशियातून प्रस्ताव; BMC खरेदी करणार १ कोटी लसीचे डोस

मुंबईतील लसीचा तुटवडा पाहता काही दिवसांपूर्वी पालिकेने जागतिक निविदा काढली होती. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पालिकेने मुदतवाढ दिल्यानंतर आता तीन खासगी कंपन्यांनी रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस पुरण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. पालिकेने १ कोटी लसीचे डोस खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे. मुंबई महानगरपालिकेने ११ मे रोजी निविदा काढली होती. निविदेची तारीख २५ मे रोजी संपणार आहे. मात्र तत्पूर्वी तीन प्रस्ताव आले आहेत. यापैकी एक प्रस्ताव थेट रशियन डायरेक्टर इनव्हेस्टमेंट फंडकडून आला आहे. तर दोन प्रस्ताव इतर खासगी कंपन्यांकडून आले आहेत. तिन्ही कंपन्यांनी रशियाच्या स्टुटनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे.

  मुंबई : मुंबईतील लसीचा तुटवडा पाहता काही दिवसांपूर्वी पालिकेने जागतिक निविदा काढली होती. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पालिकेने मुदतवाढ दिल्यानंतर आता तीन खासगी कंपन्यांनी रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस पुरण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. पालिकेने १ कोटी लसीचे डोस खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे.
  मुंबई महानगरपालिकेने ११ मे रोजी निविदा काढली होती. निविदेची तारीख २५ मे रोजी संपणार आहे. मात्र, तत्पूर्वी तीन प्रस्ताव आले आहेत. यापैकी एक प्रस्ताव थेट रशियन डायरेक्टर इनव्हेस्टमेंट फंडकडून आला आहे. तर दोन प्रस्ताव इतर खासगी कंपन्यांकडून आले आहेत. तिन्ही कंपन्यांनी रशियाच्या स्टुटनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे.

  रशियातील स्पुटनिक व्ही लशीला देशात परवानगी मिळाली आहे. त्यानंतर लसीकरणही सुरु झाले आहे. मुंबई महापालिका लस खरेदीवर ३०० ते ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे ६० ते ९० दिवसांच्या आता लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे.

  दुसरीकडे पंजाब आणि दिल्ली सरकारने काढलेल्या निविदेला खासगी कंपन्यांनी पाठ दाखवली आहे. रशियामधून पहिला साठा हा १ मे रोजी भरतात दाखल झाला. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली. पुढील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात या लसीचा साठा पाठवला जाईल. त्यादरम्यान दुसरीकडे भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जाणार आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.

  कांजूरमार्गमध्ये मोठे लस साठवणूक केंद्र

  मुंबईत लस साठवणुकीसाठी कांजूरमार्गमध्ये आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त असे केंद्र तयार केले असून येथे सुमारे १.५ कोटी लसीची मात्रा ठेवण्याची क्षमता या केंद्रात आहे. तसेच ‘स्पुटनिक’ लसीसाठी आवश्यक असणाऱ्या तपामानाचीही या केंद्रात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

  कांजूरमार्ग येथे पहिल्या मजल्यावर ४.५ कोटींचा खर्च करून हे केंद्र तयार केले आहे. येथे लस साठवणुकीसाठी दोन कुलर्स आहेत. एका कुलरची क्षमता २ अंश सेल्सिअसपर्यंत खाली तापमान करण्याची सोय आहे, तर दुसरे कुलर्समध्ये कमाल ८ अंश सेल्सिअस तापमानाची सोय आहे. सध्या मुंबईसह राज्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन लसीचे डोस दिले जात आहेत. कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड संशोधित आणि सीरम इन्िस्टट्युट निर्मित लस असून कोवॅक्सीन भारतीय बायोटेकने तयार केली आहे. तसेच आता रशियाची स्पुटनिक लसही भारतात दाखल झाली आहे.

  कांजूरमार्गच्या केंद्रात स्थलांतरित करता येऊ शकणारे कुलर्स आहेत. तसेच याचे तापमान २५ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवण्यात येते. त्यामुळे रशियाची लस येथे ठेवणे शक्य होणार आहे. रशियाच्या लसीसाठी १७ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.