शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि अंमलबजावणी संचालनालय
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि अंमलबजावणी संचालनालय

मनी लॉड्रिंगप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून शिवसेनेचे  ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक, मुलगा पुर्वेश आणि विंहग आणि योगेश चांदेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका  दाखल केली आहे. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाल(ईडी)ने कठोर कारवाई करू  नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सदर याचिकेवर मंगळवारी (आज) सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

    मुंबई : मनी लॉड्रिंगप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून शिवसेनेचे  ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक, मुलगा पुर्वेश आणि विंहग आणि योगेश चांदेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका  दाखल केली आहे. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाल(ईडी)ने कठोर कारवाई करू  नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सदर याचिकेवर मंगळवारी (आज) सुनावणी पार पडण्याची शक्यता
    आहे.

    एऩएसईएल म्हणजेच नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात यावर्षी एप्रिल महिन्यात विकासक योगेश देशमुखला  अटक करण्यात आली होती. सुमारे ५,५०० कोटींचा सावकारीशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यातच देशमुख हे प्रताप  सरनाईक यांचे निटकवर्तीय असल्याचे सांगत ईडी त्यांच्या मागावर असून सरनाईक गायब असल्याचा दावा भाजपाकडून  किरिट सोमय्या यांनी समाज माध्यमावरून केला होता. आस्था ग्रुप या काळ्या यादीतील कंपनीसोबत एनएसईएलमध्ये  २५० कोटींची अफरातफर केल्याचा आरोप सरनाईक यांच्या निहंग ग्रुपवर ठपका ठेवण्यात आला आहे. विहंग आणि
    आस्था ग्रुप यांना संयक्त विद्यमाने विहंग हाऊंसिग प्रोजेक्ट नावाने प्रकल्प सुरू केला आणि त्यातंर्गत विकासक देशमुख यांच्या मदतीने टिटवाळा येथील अनेक जमिनी खरेदी केल्या. त्यातील काही जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. त्यात २२ कोटींची फसवणूक समोर आली. त्यात एक कोटी शेतकऱ्याला देण्यात आले. तर १२ सरनाईक यांच्या आणि १० कोटी देशमुख यांच्या खात्यात वळविण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.

    २०१४ मध्ये ईडीने  टिटवाळ्यातील हा भूखंड जप्त करून प्राधिकरणाकडून भूखंड जप्तीची पुष्टी केली होती. तसेच या जागेचा कोणताही व्यवहार
    होऊ नये, म्हणून ईडीने स्थानिक महसूल प्राधिकरणास जप्तीबाबत माहिती दिली होती. मात्र, जानेवारी महिन्यात सरनाईक  यांच्या मदतीने विकासक देशमुख यांनी ईडीने जप्त केलेला भूंखड विक्रीसाठी काढला असल्याची बाब निदर्शानस आली  आणि ईडीने तपास करण्यास सुरुवात केली.

    यापूर्वी ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. टॉप्स ग्रुप या खासगी सिक्युरिटी फर्मप्रकरणी ईडीने मनी लॉड्रींगतर्गत तपास करत असताना प्रताप सरनाईक, विहंग आणि योगेश यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.