shiv sena asks central government to stop use of loudspeakers on mosques vb

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या हिंचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला( Protest against Lakhimpur Khiri violence). त्याचबरोबर या निषेधार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची (Maharashtra bandh)हाक दिली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

    मुंबई : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या हिंचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला( Protest against Lakhimpur Khiri violence). त्याचबरोबर या निषेधार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची (Maharashtra bandh)हाक दिली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

    या पार्श्वभूमीवर शनिवारी महाविकासआघाडीच्या घटक पक्षां पत्रकारपरिषद झाली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, हा बंद 100 टक्के यशस्वी होणार असल्याचा दावा केला. पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतदेखील उपस्थित होते.

    दोन दिवसांपूर्वी मी दिल्लीत होतो. राहुल गांधी यांच्याशी देखील माझी या विषयावर चर्चा झाली. महाराष्ट्रापाठोपाठ इतर राज्यांनी देखील अशाप्रकारच पावले उचलावी, जिथे-जिथे आपली सरकारे आहेत, जिथे संघटन मजबूत आहे, त्या सर्वच राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हा बंद पुकारला जावा आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपल्याला रस्त्यावर जरी उतरता आले नाही, तरी जिथून आहे तिथून पाठींबा द्यावा. त्या शिवाय या निघृण कृतीला आळा बसणार नाही, असे राऊत म्हणाले. पण ताकद लावण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. एकदा बंदचा पुकारा केल्यावर आणि मुख्यमंत्री व शरद पवार यांनी देखील त्या बंदबाबत भूमिका जाहीर केल्यावर, लोकं स्वयंस्फुर्तीने हा बंद पाळतील. हा बंद 100 टक्के यशस्वी होईल, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला.

    केंद्र सरकार किंवा त्या संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता भरलेली आहे आणि या विरोधात देशातील जनता झोपलेली नाही. अन्नदाता शेतकरी एकाकी नाही. हे दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. याची सुरूवात महाराष्ट्रामधून व्हावी, यासाठी महाविकासआघाडीने 11 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये तिन्ही पक्ष सहभागी होतील. काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांबरोबर शिवसेना देखील या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरेल.

    - संजय राऊत, खासदार शिवसेना