कांदा निर्यात बंदी विरुद्ध दिल्लीत आंदोलन करणार : बच्चू कडू

केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी करण्याचं काही कारण नव्हतं. परंतु केंद्र सरकारने उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करायला पाहीजे होता. मात्र, मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालवली आहे. अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केली आहे.

मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी करण्याचं काही कारण नव्हतं. परंतु केंद्र सरकारने उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करायला पाहीजे होता. मात्र, मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालवली आहे. अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, कांदा निर्यात बंदी करण्याचं काही कारण नव्हतं. परंतु केंद्र सरकारने उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करायला पाहीजे होता. मात्र, मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालवली आहे. नाशिकच्या सभेत मोदी सरकार नेहमी म्हणायचे की, मी कांदा उत्पादक शेतकऱ्याशी हरामी करणार नाही. त्यामुळे कारण नसतांना सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव कमी करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा खाणाऱ्याचा विचार होत असेल तर दिल्लीच्या वाणिज्य किंवा कृषी मंत्रालयामध्ये दहा ते पंधरा शेतकरी येऊन धडकणार आणि तिथे आम्ही आंदोलन करणार आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची लूट :

शेतकऱ्यांना शेतमालास भाव मिळू लागल्यास केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची लूट कशी होईल. हे पाहत आहे, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी लवकरच दिल्लीत आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आला आहे.