
राज्यासह देशात कोरोनाचे थैमान माजलेले असतानाच्या काळातही जे.जे. रूग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांनी अतिशय अभिमानास्पद कामगिरी केली आहे. नॉन कोविड रुग्णालय असतानाही गंभीर अवस्थेत प्रसूतीसाठी पोहोचलेल्या १९२ कोविड पॉझिटिव्ह महिलांची सुरक्षित बाळंतपणं करून आई आणि मूल दोघांचेही जीव वाचविण्याचे अमूल्य कार्य जे.जे.रूग्णालयातील डॉक्टरांनी केले आहे.
मुंबई (Mumbai). राज्यासह देशात कोरोनाचे थैमान माजलेले असतानाच्या काळातही जे.जे. रूग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांनी अतिशय अभिमानास्पद कामगिरी केली आहे. नॉन कोविड रुग्णालय असतानाही गंभीर अवस्थेत प्रसूतीसाठी पोहोचलेल्या १९२ कोविड पॉझिटिव्ह महिलांची सुरक्षित बाळंतपणं करून आई आणि मूल दोघांचेही जीव वाचविण्याचे अमूल्य कार्य जे.जे.रूग्णालयातील डॉक्टरांनी केले आहे.
मुंबईतील एकमेव असे जे.जे.रूग्णालय आहे की ज्याला कोरोनाच्या काळातही नॉन कोविड रूगणालय म्हणून ठेवण्यात आले होते.कोरोना काळात इतर रोगांवर उपचार व्हावेत हा यामागचा उददेश होता. जे. जे. रूग्णालयाच्या प्रसूती व स्त्री रोग विभागप्रमुख डॉ.राजेश्री कटके म्हणाल्या,लॉकडाउन सुरू झाल्यापासून आतापर्यंत आम्ही १९२ कोविड पॉझिटिव्ह गरोदर महिलांची बाळंतपण केली आहेत.लॉकडाउनच्या काळात इतर रूग्णालयांनी कोरोनाच्या भितीने हात वर केले होते.गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी अडचणी निर्माण होणार हे पाहून ही रूग्णालये या महिलांना अगदी शेवटच्या क्षणी जे.जे.मध्ये जायला सांगत होती.त्यांचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत त्यांचे बाळंतपण उरकलेले देखील असायचे.
आम्ही गरोदर महिलांसाठी ट्रान्झिट वॉर्ड तयार केला होता.तिथे सर्व महिलांची चाचणी व्हायची.मात्र त्याचा अहवाल येईपर्यंत त्यांची नैसर्गिक किंवा सिझेरियन डिलेव्हरी झालेली असायची.रूग्ण प्रसूतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आमच्याकडे यायचा.कोरोना अहवालाची वाट बसेपर्यत् आमच्याकडे वेळही उरलेला नसायचा.केवळ खबरदारीच्या सर्व उपाययोजना करून आई आणि मूल दोघांचेही जीव वाचविणे इतकेच आमच्या हातात होते.काही गरोदर महिलांमध्ये लक्षणे आढळायची तर काहींमध्ये काहीच लक्षणे दिसत नव्हती.मात्र बाळंतपणानंतर महिलांची प्रकृती पाहून काहींना कामा रूग्णालयात तर गंभीर असणा-या महिलांना सेंट जॉर्जमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले.मात्र आतापर्यंत सुदैवाने यातील एकही महिला किंवा बाळाचा मृत्यू झालेला नाही हे यश असल्याचेही डॉ.कटके म्हणाल्या.