मुंब्रातील अवैध गुरांच्या कत्तलीची शहानिशा करा; मुंबई उच्च न्यायालयाचे ठाणे पोलीस आयुक्तांना निर्देश

ठाण्यातील मुंब्रा परिसरात बकरी ईद (Goat Eid in Mumbra) निमित्त अवैधरित्या गुरांची कत्तल होत असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (the Mumbai High Court) दखल करण्यात आली आहे. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने ....

    मुंबई (Mumbai).  ठाण्यातील मुंब्रा परिसरात बकरी ईद (Goat Eid in Mumbra) निमित्त अवैधरित्या गुरांची कत्तल होत असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (the Mumbai High Court) दखल करण्यात आली आहे. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने ठाणे महानगरपालिकेला जाब विचारला आणि ठाणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात शहानिशा करण्याचे निर्देश दिले.

    गौ-ग्यान फाऊडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने ठाण्यातील मुब्रा परिसरात बकरी ईद निमित्त अवैधरित्या गुरांची कत्तल होत असल्याचा आरोप करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी न्या एस. एस. शिंदे आणि न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, बकरी ईद निमित्त सदर परिसरात अवैधरित्या जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती आम्ही ठाणे पोलिसांना दिली.

    मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आम्ही न्यायालयात धाव घेतली असल्याचे याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना अँड. जे. एस. किनी यांनी खंडपीठाला सांगितले. जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल होण्याची दाट शक्यता आहे.

    तातडीने कडक कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी खंडपीठाला सांगितले. त्यांची बाजू ऐकून घेत केवळ परवानाधारक कत्तलखान्यांमध्येच जनावरांची कत्तल करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच पालिका प्रशासनाने दिलेल्या जागेवर आणि ठरविलेल्या वेळेतच कत्तलीस परवानगी दिली आहे. असे स्पष्ट करत खंडपीठाने ठाणे पोलीस आयुक्तांना सदर ठिकाणी जनावरांची अवैधरित्या कत्तल करण्यात येत आहे का त्याबाबत शहानिशा करून त्याबाबत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी ६ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.