good news for pubg mobile lovers as game is trying for a return in india with the help of airtel
PUBG चाहत्यांसाठी गुड न्यूज, एअरटेलसोबत गेम पुन्हा येण्याच्या तयारीत

जोगेश्वरी येथील १६ वर्षाच्या मुलाला खेळाचे मोठ्या प्रमाणात व्यसन लागले. ते व्यसन इतके वाढले की, या मुलाने आईच्या खात्यातून तब्बल १० लाख रुपये लंपास केले. या खेळासाठी हा मुलगा अक्षरश: खुळा झाला. परंतु, घरी पालकांना या गोष्टीबद्दल संशय आला. त्यानंतर त्यांच्या पैशाबद्दल लक्षात आले मुलाने पैसे काढले आहेत म्हणून; त्यामुळे त्यांनी मुलाला चांगलेच फटकारले. त्यावर तो मुलगा रागात घर सोडून गेल्याची घटना घडली.

    मुंबई : जोगेश्वरी भागातून पब्जीच्या वेडापायी आईच्या बँक खात्यातील १० लाख उडवणारा आणि त्यानंतर चिट्ठी लिहून पळून जाणाऱ्या १६ वर्षीय मुलाला दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे.

    जोगेश्वरी येथील १६ वर्षाच्या मुलाला खेळाचे मोठ्या प्रमाणात व्यसन लागले. ते व्यसन इतके वाढले की, या मुलाने आईच्या खात्यातून तब्बल १० लाख रुपये लंपास केले. या खेळासाठी हा मुलगा अक्षरश: खुळा झाला. परंतु, घरी पालकांना या गोष्टीबद्दल संशय आला. त्यानंतर त्यांच्या पैशाबद्दल लक्षात आले मुलाने पैसे काढले आहेत म्हणून; त्यामुळे त्यांनी मुलाला चांगलेच फटकारले. त्यावर तो मुलगा रागात घर सोडून गेल्याची घटना घडली.

    या मुलाने घर सोडून जाताना त्याने मागे पालकांसाठी एक पत्र सोडले, जेव्हा पालकांना पत्र मिळाले, त्यांनी ते वाचले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलाने त्यामध्ये ‘आई-वडिलांनी रागावल्यामुळे मी घर सोडून जात आहे आणि मी पुन्हा कधीच येणार नाही’, यानंतर त्यांनी मुलाबाबत पोलिसात माहिती दिली.

    पोलिसांना याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने मुलाचा शोध सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही शोधले पण कोणताही पुरावा सापडला नाही. त्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा मुलगा अंधेरी (पूर्व) परिसरात सापडला. स्थित महाकाली गुहा परिसरात फिरताना दिसला. त्यानंतर गुन्हे शाखेने मुलाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने मुलाचे समुपदेशन करून त्याला त्याच्या पालकांकडे सुपुर्द केले.